मुंबई( गणेश हिरवे)जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथील अरविंद गंडभीर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या "निर्धार-एक हात आपुलकीचा" या सामाजिक संस्थेने येऊर (ठाणे) येथील काही आदिवासी पाड्यांमध्ये दिवाळी निमित्त दिनांक २० ऑक्टोबर रोजी फराळ व अन्नधान्य किट वाटप केले. जांभूळपाडा, नारळीपाडा, पाटील पाडा, वणीचा पाडा, फुफाणे पाडा, पाटीलपाडा, येऊर गाव ह्या सर्व पाड्यावर १५० लोकाना फराळ वाटप व ७५ लोकाना फराळ व अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.त्याच बरोबर लहान मुलाना खाऊ वाटप, जुन्या कपड्याचे व शालेय वस्तू चे वाटप करण्यात आले. यावेळी नाच गाणी करून येथील बंधू भगिनीं बरोबर अतिशय आनंदाने दिवाळी साजरी करण्यात आली.
तसेच आदीवासीना शिक्षण आणि कौशल्य विकास या दृष्टीने या वर्षी निर्धारने येऊर पाड्यातील ९ विद्यार्थ्यांना आय टी आय संस्थेमध्ये प्रवेश घेण्यास आर्थिक मदत केली तसेच त्यांची कॉलेज फी भरण्यात आली.
सर्व देणगीदारांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा