मुंबई (गणेश हिरवे)जोगेश्वरी पूर्वेतील श्री समर्थ माध्यमिक विद्यालय आणि श्रीमती लक्ष्मीबाई वळंजू प्राथमिक शाळेतील एकूण २०० विद्यार्थ्याना दिवाळी फराळाचे वाटप नुकतेच जोगेश्वरी विभागातील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे, सूर्यकांत सालम, हेमंत चौधरी, सुरक्षा घोसाळकर, ज्ञानेश्वर परब, दिलीप कदम यांच्या सहकार्यातून करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे उपस्थित होते. आरोग्य आणि खेळाचे अपल्या जीवनात खूप महत्वाचे असून येणाऱ्या दिवाळी निमित्त फटाके वाजवताना विद्यार्थ्यानी प्रदूषण होऊ न देणे आणि सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले.दरवर्षी येथील विद्यार्थ्याना हिरवे यांच्या पुढाकाराने शैक्षिणक साहित्य, मिठाई बॉक्स असे काही ना काहीतरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत असल्याचं मुख्याध्यापक मधुकर पोर्लेकर यांनी सांगितले.येथे येणारी ८० टक्के मुल ही गोरेगाव आरे कॉलोनी येथील आदिवासी पाड्यातील आहेत.ही मुलं गरीब असली तरी अभ्यासात आणि खेळात हुशार आहेत.डॉ महादेव वळंजू या शाळेचे अध्यक्ष असून शाळेतील मुल कोणत्याही सोयी सुविधे पासून वंचित राहता काम नये म्हणून कायमच ते पुढाकार घेतना दिसतात. डॉ वळंजू हे जोगेश्वरीतील एक आदरणीय विश्वासू व्यक्तिमत्व असल्याचे हिरवे यांनी सांगून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे सांगितले.यावेळी प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सुनीता निंबाळकर, शाळेतील शिक्षक, स्टाफ उपस्थित होते.फराळ वितरीत करण्यासाठी शीलाताई येरागी, छायाताई राणे, मुकेश नायक, रफिक शेख, सुरेश घाणे, सुजाता नार्वेकर, समर्थ संस्थेचे खजिनदार पाटकर साहेब आदी मान्यवर वेळात वेळ काढून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिक्षक राजपकर सरांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन
मुंबई (शांताराम गुडेकर ) साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा