आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन

मुंबई (शांताराम गुडेकर )   साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार, प्रमुख पाहुणे चिपळूण तालुक्याचे पोस्ट मास्तर पानवलकर साहेब,सहसंपादक युयुत्सू आर्ते,संगमेश्वर तालुका प्रतिनिधी सत्यवान विचारे,रत्नागिरी शहर प्रतिनिधी श्री/सौ. मेहरुन्निसा साखरकर, मुंबई प्रतिनिधी विलास कासार,चिपळूण तालुका प्रतिनिधी संतोष शिंदे,चिपळूण जाहिरात प्रतिनिधी सौ.रुपाली शिंदे,सौ.दिपा कोलतेकर,सौ.सुविधा कासार,डीटीपी ऑपरेटर सुरेश काजारी,लोकनिर्माण प्रतिष्ठान चे सचिव संजय गोरीवले,छाया चित्रकार आयुष गोरीवले यांच्या हस्ते चिपळूण येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाले.
       संपादक बाळकृष्ण कासार हे पत्रकारिता बरोबर समाजसेवा मध्येही तेवढाच भाग घेतात.महिला दिनानिमित्त निवडक महिलांना लोकनिर्माण पुरस्काराने सन्मानित, कामगार दिनानिमित्त राज्यातील गुणवंत कामगारांना लोकनिर्माण पुरस्काराने सन्मानित,त्या पलीकडे अंध कुटुंबियांच्या पुनर्वसनाची जबाबदारी, टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरविण्याचे काम,शासकीय अनुदान विध्यार्थ्यांना मलेरिया लागवण होऊ नये या करिता मोफत मच्छरदाणी वाटप अशा विविध सामाजिक बांधिलकी ते आजवर जोपासत आले आहेत,एक जेष्ठ समाजसेवक अशी ओळख आहे.
कासार हे दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत, आम्ही त्यांच्या बरोबर काम करत असताना आम्हाला ते प्रत्येक गोष्टी समजावून सांगत असत,आम्ही त्यांच्या पेक्षा वयाने लहान असलो तरी आमच्या सोबत बोलताना मानसन्मानाने बोलतात ,कुठे जर चूक झाली तर एक वेळ समजावून सांगणार आणि पुन्हा तीच चूक झाली तर पत्रकारिततेच्या रुपात मात्र आसूड ओढत असतात.
        सामाजिक कार्यात सहभाग, कुठेही भटकंती आणि या सगळ्यांमधून वेळ काढून पुन्हा दर हप्त्याला साप्ताहिक लोकनिर्माण अंकाचा जन्म...हे सगळे या संपादक महोदयांना कसे जमतं कुणास ठाऊक..? मुख्य बाब म्हणजे या १६ वर्षात वाचकांना साप्ताहिक लोकनिर्माणने फक्त चार पानी अंक दिले नाहीत तर राष्ट्रीय,सांस्कृति सणवार तसेच वर्षातील विशेष दिनांवर " विशेष लेख " आणि दिवाळी अंक वाचायला देऊन वाचकांना त्याच्यातील दर्जेदार लेखांनी तृप्त केले.महाराष्ट्रात भले अनेक दैनिक आज निघत असतील मात्र त्यांच्या मध्ये "साप्ताहिक लोकनिर्माण " चा वेगळेपणा नक्कीच उठून दिसतो पुढे दिसेल.गेली १६ वर्षे वाचकांच्या मनावर अधिराज्य केलेले हे साप्ताहिक भविष्यात आणखीन मोठी गरूडझेप घेत राहो याच सदिच्छा या वर्धापनदिनी.१७ व्या वर्षातील पदार्पण आणखीनच दर्जेदार व्हावे अशा शुभेच्छा यानिमित्ताने अनेकांनी दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन

मुंबई (शांताराम गुडेकर )   साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...