मुंबई ( प्रतिनिधी) सार्वजनिक पूजा समिती यंदा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने भांडुपगाव येथे सार्वजनिक पूजा समिती भांडुपगाव, आणि फॉरटीज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० ऑक्टोबर, २०२४ रोजी मोफत आरोग्य तपासणी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्त शिबिरासाठी फॉरटीज हॉस्पिटल मधील डॉ. बोमन धाबर, (कर्करोग तज्ज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.कीर्ती म्हात्रे, डॉ. श्रद्धा देवकर, डॉ. अंकित तांबे, डॉ. पोरू धाबर, डॉ. जसीम खान या डॉक्टरांनी लोकांना तपासून मार्गदर्शन केले.
सार्वजनिक पूजा समितीचे अध्यक्ष, कामगार नेते श्री. परशुराम कोपरकर यांनी डॉ. बोमन धाबर यांचे स्वागत व सत्कार करून आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन केले. या आरोग्य तपासणी शिबिराचा भांडुप मधील सुमारे २०० नागरिकांनी लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी धनंजय म्हात्रे, महेश पाटील, रमेश शेलार, प्रा. जयवंत पाटील, उषा काकडे, मयुर म्हात्रे, दयानंद पवार, शिवा सुवरे, रजनी पाटील, सोनम भावेश कोपरकर, हेमंत वाघिलकर, दिनेश कोपरकर, संजय उलवेकर, राहुल खराटे, भारती किनी, पल्लवी खारकर, प्रमिला कोपरकर, स्मिता मिसाळ, उमा मळेकर इ. कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा