मुंबई (शांताराम गुडेकर )परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी शेडगेबाबा यांनी घाटकोपर येथील काजरोळकर सोसायटीमध्ये परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी भक्तीधाम सेवाश्रमची स्थापना केली त्यांच्या माध्यमातून खूप असे समाजकार्य होत असते. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, व्यसनमुक्ती, प्रवचनकार, कीर्तनकार हे बाबांनी घडवले. तसेच बाबांच्या हातून अनेक असे शिष्यगण घडले की त्यांनी आपलं महाड पोलादपूर रायगड नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बाबांचं नाव उज्वल केलं तीच परंपरा त्यांचे पुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे जपत आहेत हेच कार्य पाहून त्यांना 2024 चा आदर्श रायगड वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचा आदर्श रायगड राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला. ह भ प श्री रामचंद्र महाराज रिंगे. (भजनमूर्ती), ह भ प सुनील महाराज मेस्त्री (गुरुजी), ह भ प अंकुश महाराज कुमठेकर ( गायनाचार्य ) यांचा अंबरनाथ पूर्व येथील वीर बाजीप्रभू देशपांडे पंथ स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सामाजिक शैक्षणिक क्रीडा पत्रकारिता साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना गौरवण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान
मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा