आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

आदर्श वार्ताहर काव्यांगण

पितरं

सगले तये एकुच दिसते चित्र 
ज्याचे घरा पित्र तोच खरा मित्र 

त्यानं पन पक्का मान 
व्हारल्या शिवाय कोनी येवाचा नय 
ना त्यांजू खाल्या शिवाय 
आमचा कावला शिवाचा नय 
सगले तये एकुच दिसतंय चित्र 
ज्याचे घरा पित्र तोच खरा मित्र 

आमचे डोक्रीचे नावाशी खाऊन जेला 
पन जितेपनी तिला बगाला कवच नय आयला 
आवरे दिस डोक्री आमची कोनाला नय कलली 
ना जमीन इकाला बिल्डरचे हापिसान सजून धजून आयली 
सगले तये एकूच दिसतंय चित्र 
ज्याचे घरा पित्र तोच खरा मित्र 

जितेपनी डोक्रिला गोर धोर कवा नाय मिलला
पन बिल्डरचे हाफिसान
बिर्यानी खावाला डोक्री चा मान पयला 
हिस्सासाठी तिला खावाला दिलं मटननुच नुसतं
तवा डोक्री बोलली आरं दादा माजा दात दुखतं
सगले तया एकुचं दिसतंय चित्र 
ज्याचे घरा पित्र तोच खरा मित्र 

नातं पुतं बयनिसा आयल्या हिस्सा मागाला 
ना दादा आमचा जितेपनीच निगाला माय ईकाला 
आतं दोनी आस गेल्यावं त्याला याद येतंय
ना तिचेच पैशानश्या दोस्ताला खावाला दितय 
जितेपनी नय विचारी तीला कुत्र 
ना मोठीं आता बोलतंन...
ज्याचे घरा पित्र तोच खरा मित्र

©®कवी संदेश प्रकाश भोईर
एक्सर तळेपखाडी 
बोरीवली मुंबई 
२२/९/ २०१७
बोलाचा आसल तं
८७७९५४००८०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान

मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...