आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

कुसूरचा वाडिया जत्रोत्सव २९ नोव्हेंबर रोजी

वैभववाडी - तालुक्यातील कुसूर गावचे ग्रामदैवत श्री स्वयंभू रामेश्वर आणि नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असणारी श्री शक्ती दारूबाई यांचा वाडिया जत्रोत्सव यावर्षी शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर आणि शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला हा वाडिया जत्रोत्सव दरवर्षी कार्तिक महिन्याच्या चतुर्दशी अमावास्येला साजरा होत असतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच मुंबई, पूणे, कोल्हापूर सोबतच गोवा, कर्नाटक, दिल्ली आणि इतर राज्यांतील हजारों भाविक मोठ्या भक्तिभावाने सदर जत्रोत्सवात दरवर्षी हजेरी लावतात.
     कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे - शुक्रवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी 'देवळातील वाडिया' संपन्न होतील, रात्री १० वाजता श्री देव रामेश्वर, शक्ती दारूबाई मंदिरात साळुंखे पाटील, सात हिस्सेदार मंडळींकडून पुजाअर्चा, देवीची ओटी भरणे, देवतांना नैवेद्य वाडी दाखवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. तर शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. यावेळी माहेरवाशिणी आणि गावातील लेकी - सुना, देवी आई दारूबाईची ओटी भरून दर्शन घेतील. तरी भाविकांनी वाडिया जत्रोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुसूर ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान

मुंबई(शांताराम गुडेकर ) लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वि...