आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

पुणे विद्यापीठ संत नामदेव अध्यासन प्रमुख प्राध्यापक पदी डॉ. श्यामा घोणसे यांची नियुक्ती

पुणे: पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संत नामदेव अध्यासन प्रमुख प्राध्यापक पदी डॉ. श्यामा घोणसे (पुणे) यांची दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी माननीय कुलगुरू गोसावी यांनी  नियुक्ती केली.पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालय मराठी विषयाच्या विभाग प्रमुख म्हणून तीस वर्षांच्या सेवेनंतर त्या सेवानिवृत झाल्या. मध्ययुगीन मराठी वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासक आणि भारतीय स्त्री साहित्याच्या जाणकार असणाऱ्या डॉ .घोणसे यांनी वारकरी- वीरशैव आणि समर्थ संप्रदायाच्या संदर्भात काही नवीन अभ्यासदिशा सूचित केल्या असून त्यांचे समीक्षात्मक ११ ग्रंथ, ३५ शोध निबंध प्रसिद्ध आहेत. त्यांच्या "भारतीय संत आणि सामाजिक समरसता" आणि "क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर" या ग्रंथांनी अखिल भारतीय संत परंपरेचा सखोल आढावा घेतलेला आहे. ३५ राज्यस्तरीय, २२ राष्ट्रीय, २ आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांनी आपली शोध निबंध सादर केले आहेत. संत नामदेव अध्यासनाच्या प्रारंभापासून त्या विद्यार्थी म्हणून संशोधक म्हणून निगडित आहेत.
दि. १२ नोव्हेंबर २०२४ संत नामदेव महाराज यांची ७५४ वी जयंती पुणे विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरा करून नामदेव अध्यासनाचे कामाची सुरूवात करून नामदेव महाराज यांचे कार्याचा प्रसार व प्रचार करण्याचे प्राधान्यक्रमाने त्यांनी ठरवले आहे. 
   डॉ. श्यामा घोणसे यांचे नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेच्या वतीने अध्यक्ष संदीप लचके आणि सचिव सुभाष मुळे यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन

मुंबई (शांताराम गुडेकर )   साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...