मुलुंड(सतिश वि.पाटील ) दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवई आणि एल अँड टी रियालिटी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच तरुण उत्कर्ष मंडळ व रोटरी क्लब ऑफ मुलुंड यांच्या सहकार्याने आज तरूण उत्कर्ष विद्यामंदिर गव्हाण पाडा मुलुंड (पूर्व )मुंबई येथे निःशुल्क मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात २२५ पेक्षा लोकांनी सेवेचा लाभ घेतला. डोळे तपासणी व चष्मा, बीपी, शुगर, शारिरीक आजार, तसेच महिलांना अनेक शारीरिक व्याधी वर उत्तम असे मार्गदर्शन तसेच मोफत औषधे वाटण्यात आली.व्याधी ग्रस्त लोकांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करण्याचे सांगण्यात आले. सदर मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ मुलुंड पूर्व च्या अध्यक्षा अनंत लक्ष्मी अय्यर आणि सहकारी तसेच तरुण उत्कर्ष मंडळाचे श्री भालचंद्र वैती अध्यक्ष, कैलास पाटील सचिव, यांनी केले होते, सदर वैद्यकीय शिबिर श्री उदय वैती, ऋषिकेश वैती, श्री.विकास वैती, श्री जयेश वैती श्री निशिकांत पाटील, श्री राजन भोसले यांनी सहभाग घेऊन शिबिर यशस्वी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर
मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा