मुंबई : मराठी उद्योजक सूर्यकांत निकम यांनी नव्याने मालाड पुर्व येथील, अजंठा शॉपिंग सेंटर येथे, दीपावलीचे औचित्य साधून "आरंभ सारीज" चा शोरूम सुरु केला आहे.
तदप्रसंगी मनसे सरचिटणीस - रिटा गुप्ता, प्रवक्ते हेमंत कांबळे मनसे विधानसभा उमेदवार भास्कर परब, महेश फरकासे, विभाग अध्यक्षा - वनिता घाग, विभाग सचिव - राकेश घनावडे, उपविभाग अध्यक्ष - केतन नाईक, धनंजय पानबुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोरेगाव, मालाड व कांदीवली पुर्वच्या नागरिकांना साड्या खरेदी साठी मालाड पश्चिम येथे जावे लागतं असे, आता देशभरातील सर्व प्रकारच्या साड्या वाजवी दरात " आरंभ साडी " यांच्या येथे उपलब्ध झाल्या मुळे नागरिकांना मलाड पश्चिम येथे जाण्याची गरज भासणार नाही. असे सूर्यकांत निकम यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा