आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

उरण मध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून साकारला जेजुरीचा देखावा ; वादन एक कलाचा राजा या संघटनेतर्फे आयोजन

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वादन एक कलाचा राजा या सामाजिक संघटनेतर्फे साखर चौथीचा गणपती कामगार वसाहत( वाडी) उरण शहर, कामठा रोड येथे विराजमान झाला आहे.दरवर्षी येथे गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.याही वर्षी वादन एक कलाचा राजा या संघटनेतर्फे कामगार वसाहत वाडी उरण शहर येथे भव्य दिव्य असे जेजुरीच्या खंडेरायाचे प्रतिकृती गणेशोत्सव निमित्त साकारण्यात आले आहे. येथील गणेशमूर्तीचे दर्शन घेतल्यावर साक्षात जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्याचा अनुभव भाविक भक्तांना येत आहे. मूर्तिकार साई ठाकूर यांनी गणपतीची सुबक व आकर्षक मूर्ती बनवली असून भाविक भक्तांचे ती लक्ष वेधून घेत आहे. जेजुरीचे प्रतिकृती बघण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यंदाचे गणेशोत्सव साजरे करण्याचे चौथे वर्ष आहे. यंदाचा उत्सव शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ दरम्यान आहे. या दरम्यान संघटनेच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक ओमकार घरत, अध्यक्ष तेजस म्हात्रे, उपाध्यक्ष मयूर केकातपुरे व वादन एक कलाचा राजा या संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार,काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर)सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत असलेल्या पारस काव्य,कला,जनजागृती संस्था(रजि.)सानपाडा,नव...