आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

डोंबिवलीतील निळजे गावात ( मोठ्या घरी ) गणेशोत्सवानिमित्त रंगले कविसंमेलन

डोंबिवली : निळजे गावात यजमान श्री रघुनाथ पाटील यांच्या घरी ( मोठ्या घरी ) नऊ भाऊ मिळून एकत्र गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात.याच ठिकाणी कवी संगीतकार श्री राजेंद्र पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त 'आगरी साहित्य शाळे'च्या सहकार्याने कविता-गाण्यांच्या एका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.सप्टेंबर रोजी पाटील रेसिडेन्सी, मोठा घर मु.पो. निळजे येथे केले होते.
     कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून निळजे गावचे मा. सरपंच मा. श्री. गिरीधर पाटील उपस्थित होते. तर अध्यक्ष पदाची धुरा सुप्रसिद्ध साहित्यिक 'धवलारीन एक आगरी पुरोहित.' फेम श्री. नवनाथ ठाकूर यांनी सांभाळली. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध आगरी साहित्यिक, ‘कनगा’ फेम कवी श्री. जयंत पाटील, निवेदक गीतकार, संगीतकार कविकिरण पाटील यांनी उपस्थित राहून निवेदनाची धुरा सांभाळली. सर्वच कवी - कवयित्री, गायक यांनी कविता व कराओके गाण्यांनी भक्तिमय वातावरण निर्मिती करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी गायक, कवी सुनील पाटील, नितूराज पाटील, हरिश्चंद्र दळवी, मंगेश म्हात्रे, जय म्हात्रे, चंद्रकांत पाटील, अभिनेत्री सौ. प्रज्ञा म्हात्रे, कु. उत्कर्षा पाटील, कु. श्रावणी चं. पाटील या सर्वांचे सादरीकरण अप्रतिम होते. 
     कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री नामदेव पाटील, श्री बाबुराव पाटील, श्री श्रीपत म्हात्रे, श्री मनोहर पाटील, श्री राजाराम पाटील, श्री धरम सुर्यवंशी यांची लाभली. मान्यवर अध्यक्ष,प्रमुख पाहुणे व स्वागताध्यक्ष यांच्या मनोगता नंतर राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.परंतु उत्साहाने स्नेहभोजना नंतर पुन्हा एकदा मैफिल रंगली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार,काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर)सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत असलेल्या पारस काव्य,कला,जनजागृती संस्था(रजि.)सानपाडा,नव...