रविवार, २९ सप्टेंबर, २०२४
शेखर पाटील एल एल एम पदवीने सन्मानित
उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती युनिव्हर्सिटी पनवेलचे विद्यार्थी शेखर वसंत पाटील यांनी नुकतीच एल एल एम , मास्टर ऑफ लॉ मध्ये ७९.९४ मार्क मिळवून उत्तीर्ण झाले. छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी पनवेल येथे पदवीदान समारंभात पद्मश्री डॉक्टर जी डी यादव, युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष केशव बढाया, रजिस्टर डॉक्टर शर्मा यांच्या हस्ते पदवी देण्यात आली.शेखर पाटील यांनी कॉन्स्टिट्यूशन या स्पेशल सब्जेक्ट मधून पदवी ग्रहण केली . पत्रकारिता करत समाजकारण करत नोकरी सांभाळून त्यांनी एल एल एम पदवी प्राप्त केली.त्यांना लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर एस पी मिश्रा सर, डॉक्टर अवनी मॅडम, डॉक्टर पंकज सर यांनी मार्गदर्शन केले.शेखर पाटील हे उरण तालुक्यातील पिरकोन गावाचे रहिवासी असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक पदव्या घेतल्या आहेत. ते उच्च विद्याविभूषित आहेत. सामाजिक कार्याबद्दल विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.त्यांनी एल एल एम पदवी ग्रहण केल्याबद्दल त्यांचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण
मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा