उरण (विठ्ठल ममताबादे )आर्थिक विकासात मोठा वाटा असलेल्या देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे यांची निवड झाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण तालुका तर्फे खासदार तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.उरण तालुक्याचे अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी खासदार सुनील तटकरे यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रम प्रसंगी खासदार सुनील तटकरे हे स्व. दि. बा. पाटील भूमिपुत्र भवन, सेक्टर १९ ब, उलवा नोड (बामण डोंगरी )नवी मुंबई येथे आले होते. त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित दादा गट )उरण विधानसभा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, उरण तालुका युवा अध्यक्ष समत भोंगले, उरण तालुका सरचिटणीस दिनेश पाटील ,उरण तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस -अमित साहू, स्वप्नील कुंभार, दीपराज ठाकूर,भूषण ठाकूर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.कमिटीवर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचे देशभरातून अभिनंदन होत आहे. ही त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी, विशेषतः रायगड आणि कोकणासाठी अभिमानाची बाब आहे.सर्वसामान्य जनतेचे उत्तम व आदर्श नेतृत्व म्हणून जनता, नागरिक खासदार तटकरे साहेबांकडे बघते. त्यांच्या या निवडी मुळे कोकणाला खरा न्याय मिळाला आहे.असे मत उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी व्यक्त केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण
मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा