मुलुंड (सतिश वि.पाटील)पारंपारिक सण- उत्सव त्यातील एक सण गौरी गणपती साधारण सर्वांकडे साजरा केला जातो . प्रत्येकाच्या इच्छा व रितीरिवाजानुसार गौरी गणपतीची स्थापना घरोघरी केली जाते. कोण दिड दिवस,कोणी पाच दिवस,सात कोणी दहा दिवस गणपती स्थापन करून यथाशक्ती पूजा अर्चा करतात. कोकण किनारपट्टा ते महाराष्ट्रभर तसेच विदेशात देखील बुध्दीचा देवता लाडक्या गणरायाची स्थापना करून मोठ्या भक्तिभावाने घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात.
पाटील परिवार नाहूरगावठाण मुलुंड यांच्या परिवाराकडून देखील मागील पाच पिढ्यांपासून गौरीगणपतीची परंपरा आहे. आजोबा ,पंजोबा,मुल,नातू पंतू,खापरपंतू असा वसा चालू आहे. पाच दिवस चालणाऱ्या गौरीगणपती उत्सवात सर्व पाटील परिवार एकत्र येऊन गुण्या गोविंदाने हा सण साजरा करतात. रोज दोन वेळेस आरती मोठ्या भक्ती भावाने केली जाते. एकत्र जेवण आजपर्यंत पाटील परिवारातील महिलाच करतात. दोन भजन मंडळ दरवर्षी न चुकता सुंदर व भक्तिमय वातावरण निर्माण करतात . पाच दिवस पाहुण्यांची, नेत्यांची रेलचेल चालू असते. गौरी आवाहन दिवशी गावातील सुहासिनी ओवसा घेऊन रांगेत गौरीगणपतीचे दर्शन घेतात. पूर्वी रात्री झिम्मा फुगडी व बाल्या नाच असायचा .आता तो लुप्त झालाय .पाच दिवस कधी होतात हे कळत नाही. विसर्जन पूर्वीपासून नाहूरगावठाणत होत असे तेव्हा पासून गौरीगणपती डोक्यावर घेण्याची प्रथा आजही कायम आहे. पाऊस जरी असला तरी विसर्जन मिरवणूक हिरादेवी ब्राॅस बॅन्ड व परेशडेकोरेटर लाईट्स व नास्ता अशी व्यवस्था करून वाजतगाजत बाप्पाचा निरोप दिला जातो.हल्ली गावातील विहिरी बंद केल्याने खाडी व तलावात विसर्जन केले जाते.पाटील परिवाराचा पारंपारिक गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.गणपती बाप्पा मोरया !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा