मुंबई: नुकताच मुंबईत, मुंबई मराठी ग्रंथालय सूरेंद्र गावस्कर सभागृहात सकाळी सर्व उपस्थितांना चहा- नाश्ता देण्यात आले. तसेच पुरस्कारथींना भगवे फेटे बांधण्यात आले. अशा भगव्या वातावरणात, कार्यक्रमाच्या अगोदर कविसंमेलनात शाहिर राजेंद्र सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. आणि शेवटी, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 'अंगाई' गीताचे, गीतकार विलास देवळेकर, संगीत विशारद प्रसिद्ध गायिका कु. ऋतिका संजय मुरुडकर, तसेच संगीतकार एकनाथ धयाळकर आहेत.
प्रमुख पाहुणे डॉ. जगन्नाथ हेगडे (माजी नगरपाल), डॉ. सुकृत खांडेकर (संपादक दैनिक प्रहार), विलास खानोलकर (माजी दिल्ली सेन्सर बोर्ड सदस्य), राम मेस्त्री (जेष्ठ साहित्यिक), मधुकर गजाकोश (जेष्ठ साहित्यिक) आणि डॉ लक्ष्मण शिवणेकर ( जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ व साहित्यिक)यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्री माता फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, आणि दीप प्रज्वलन करून, मंचावर आगमन झाले. आणि त्या नंतर, प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि उपस्थितांचे स्वागत म्हणून, "भगवे वादळ स्वागत गीताचे" गीतकार विलास देवळेकर आणि गायक व संगीतकार एकनाथ धयाळकर यांनी सादर केले. त्या नंतर उपस्थित मंचावरील प्रमुख पाहुण्यांचे "शाल व पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह" देऊन, 'स्वागत' करण्यात आले. त्या नंतर, थोर समाजसेवक- जेष्ठ पत्रकार आणि श्रेष्ठ कवी शशिकांत सावंत. त्यांच्या "अमृत महोत्सवानिमित्त" केक कापून, आपल्या परिवारासह 'वाढदिवस' साजरा करण्यात आले. त्या वेळी, वाढदिवसाचे गीत सादर करण्यात आले. ह्या "वाढदिवस गीताचे" गीतकार विलास देवळेकर यांच्या शब्दाला संगीतबद्ध केले आहे, गायक व संगीतकार एकनाथ धयाळकर यांनी. त्या नंतर, "साप्ताहिक भगवे वादळ तृतीय वर्धापन दिनानिमित्त विशेष अंकाचे आणि शशिकांत सावंत यांच्या ७५ अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त विशेष अंकाचे " मुखपृष्ठ प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम उपस्थित विशेष मान्यवरांचे "शाल व पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह" देऊन, 'सत्कार' करण्यात आले. तसेच, शशिकांत सावंत (जेष्ठ पत्रकार- समाजसेवक- साहित्यिक) व चंद्रकांत सावंत (समाजसेवक- आदर्श शिक्षक) ह्या दोघांना "जीवन गौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, आलेल्या 'उत्तुंग कामगिरीबद्दल' मंचावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते "शाल व पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह" देऊन, विविध पुरस्काराने 'गौरविण्यात' आले. साप्ताहिक भगवे वादळ व शशिकांत सावंत यांच्यासह पुरस्कारथींचे कौतुकोद्गार काढत
"अभिनंदनपर तसेच शुभेच्छापर" भाषणं झाली.
अक्षरश्री विलास देवळेकर यांनी "शशिकांत सावंत आणि भगवे वादळ" च्या नावावर ६ फुट फ्लॅक्स कवितेने सर्वांचे 'लक्ष वेधून' घेत होते. आणि त्या सोबत, बऱ्याच जणांनी 'फोटोही' काढलेत. कार्यक्रमाच्या शेवटी "सामुदायिक राष्ट्रीय गीताने" समारोप करताना, ह्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालक शिवाजी सोनावणे यांनी सर्व उपस्थितांचे व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच, ह्या कार्यक्रमाचे उत्तम 'आयोजन व नियोजन' करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा