आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

बाप्पाच्या विसर्जनात कट्टा परिवारा कडून पुलाव वाटप

मुंबई : चिंचपोकळी पश्चिम येथून मुंबईतील नामांकित गणपती, आर्थर रोड पुलावरून गिरगांव चौपाटी येथे विसर्जनाला जातात. 
      मुंबई व उपनगरातून लाखो बाप्पा चे भक्त सकाळ पासूनच आर्थर रोड येथे गणरायाला निरोप द्यायला येतात. त्यांच्या साठी आर्थर रोड नाक्या वरील श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराच्या वतीने मोफत पुलाव व पाणी वाटपाचे आयोजन केले. त्याचे पाच हजार पेक्षा जास्त भाविकांनी लाभ घेतला.
          स्वामी मठाचे हे १२ वे वर्ष असून, जनार्दन देसाई (अध्यक्ष ), राजेंद्र चव्हाण, ( सचिव ) व रविद्र रेवडेकर ( खजिनदार ) आहेत. मंडळाचे मा. अध्यक्ष - बाळ पंडीत, रवींद्र आंबेकर उपस्थित होते. स्वामी सेवक मीनाक्षी सावंत, मनिषा शिरसेकर, प्रिया रुके, स्वाती रेवडेकर, आनंद पेवेकर यांनी फारच मेहनत घेतली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप

मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...