मुलुंड (श्री.सतिश पाटील) पहाटे चार वाजता गणेशोत्सवात निमित्त गव्हाण पाडा मुलुंडचा राजा मंडळाचे बॅनर लावत असताना बी.एम.डब्लू कारने जोरदार धडक दिली.या दुर्दैवी घटनेत प्रितम थोरात याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे तर दुसर्याची प्रकृती गंभीर आहे. प्रसाद पाटील असे युवकाचे नाव आहे.त्याच्यावर ज्युपीटर हाॅस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. मंडळाचे बॅनर लावत असताना रस्त्याच्या कडेला शिडीवर काम करत असताना गव्हाणपाडा रोड वर आकृती टाॅवरजवळ ही घटना घडली. भरधाव कार ईस्ट वेस्ट ब्रिजच्या ने मुलुंड पश्चिमच्या दिशेने फरार झाली आहे. या घटनेबाबत मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करीत आहेत.दोन महिन्यांत ही मुलुंड मधील दुसरी हिट अँड रन ची घटना आहे. अशाच प्रकारे मुलुंड डंपिंग रोड वरील ऑटो रिक्षाला भरधाव कारने धडक देऊन पसार झाले होते. मुलुंड पोलीस ठाणे यांच्या मार्फत चालकास अटक झाली होती. या घटना वारंवार का घडत आहेत ? कायद्याचे उल्लंघन करणे रोजचीच बाब झालीय का ? असा प्रश्न मुलुंडकर उपस्थित करीत आहेत.कायद्याचा धाक राहीलाच नाही का ?श्रीमंतीचा माज कुणाच्या जीवावर का बेतावा ? याबाबत सरकारने कडक निर्बंध घातले तरच शक्य आहे. नाहीतर असा घटना घडतच राहतील !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉटरी विक्रेतांचे नेते सातार्डेकर यांचा इशारा ;परप्रांतीय लॉटरीवर बहिष्कार हाच एकमेव आता उपाय !
मुंबई (प्रतिनिधी): सणासुदीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय बोगस लॉटरीचा लवकरच सुळसुळाट होणार असून, लॉटरीचे ग्राहक व विक्रेते यांनी सावध राहावे...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा