बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४
मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
कोकण - ( दिपक कारकर ) अल्पवधीत सामाजिक क्षेत्रासोबत राजकीय वर्तळात आगळीक ओळख निर्माण करणारे,गुहागर विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे उद्योजक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी गुहागर मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून,प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली,अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे,त्यात कान,नाक,घसा,डोळे,रक्त गट अशी मोफत आरोग्य तपासणी सह मोफत औषध,मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबीर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा-मुंढर (शिरबाडवाडी) येथे गुरुवार दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,अधिक माहितीसाठी पुढील ७०२०४२१९०२ ह्या भ्रमणध्वनी वरती संपर्क साधावा असे आवाहन गुहागर मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप
मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा