अशोक अँड ज्योती गोयल फाउंडेशनच्या वतीने ही गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य दिले गेले.सुमारे पन्नास गरजू विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य आणि जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रा.संजय मंगला गोपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत समाजात सर्वधर्म समभाव जपण्याचे व विविध जाती धर्मात एकोपा निर्माण करण्याचा संदेश देत सफल विकास वेलफेअर सोसायटी संस्थेच्या कामाचे कौतुक करत पुढील कामात आवश्यक सहयोग व मार्गदर्शन देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाची सुरुवात वैशाली महाडिक यांच्या हस्ते पाहुण्यांना पुष्प देऊन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निसार अली सय्यद यांनी केले.
सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४
कुर्बानीच्या पैशातून विद्यार्थ्याना सहकार्य
मुंबई ( गणेश हिरवे)बकरी ईद निमित्ताने ' कुर्बानी ' मधील काही रक्कम शालेय साहित्याच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे आवाहन राष्ट्र सेवा दल, मालवणी, काचपाडा विभाग आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मागील सात वर्षांपासून करण्यात येत आहे यंदाही तसे आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद देत मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धेत विवेकानंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स प्रथम, नेरुळचे एस आय इ एस महाविद्यालय दुसऱ्या तर डी वाय पाटील स्कूल ऑफ फार्मसी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी
प्रथम विजेता संघ नवी मुंबई : अन्वय व्यसनमुवती केंद्र आणि नशाबंदी मंडळ - महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासा...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा