आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी दिलेल्या निवेदनाला यश

गडब (अवंतिका म्हात्रे) पेण तालुक्यातील गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व पेण डेपो इन्चार्ज अपर्णा वर्तक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले होते . सदर निवेदन प्रवासी "रजादिन" याचे औचित्य साधून सदर निवेदन गडब गावातील पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षा व युवा ग्रामीण पत्रकार संघ रायगड महिला अध्यक्षा सौ. अवंतिका सुरेश म्हात्रे व रायगडची शानचे संपादक सुरेश म्हात्रे यांच्याकडून पेण विभाग नियंत्रक यांना देण्यात आले होते .
    सदर निवेदनात पेण तालुक्यातील गडब गावातील कामगार वर्ग व विद्यार्थी व इतर प्रवासी वर्ग यांना समस्या भेडसावत होती. त्यामुळे लोकांची गैरसोय लक्षात घेता हे निवेदन सौ . म्हात्रे यांनी दिले होते . यासंदर्भात पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व अपर्णा वर्तक यांच्याशी गेली दोन महिने अर्जाचा पाठपुरावा केला व वेळोवेळी स्वतः भेटून व दुरध्वनीवरून संपर्क साधला असता अखेर विभाग नियंत्रकांनी अर्जाची दखल घेत सदर समस्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या जातील व प्रवाशांचे समाधान होईल असे म्हात्रे यांच्याशी वेळोवेळी बोलताना सांगितले . त्या अनुषंगाने गडब गावा ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्या संदर्भातील फलक पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौ अवंतिका म्हात्रे व सुरेश म्हात्रे यांना फलक सुपुर्द करण्यात आले .
    सध्या गडब येथील रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याने लवकरच हे नामफलक त्यावण्यात येणार असल्याचे सौ म्हात्रे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"आखिर सच उगल दिया 2" या हिंदी गुन्हेगारी विश्वावर आधारित वेबसीरिजचे चित्रीकरण नुकतेच संपन्न!

पनवेल (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) "आखिर सच उगल दिया " या पहिल्या वेबसिरीजच्या भव्य दिव्य यशानंतर "आर्...