आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

आर्थर रोड च्या राजाच्या चरणी ११११ मोदकांचे हवन!

मुंबई : चिंचपोकळी (पश्चिम), आर्थर रोड नाका, येथील पारशीवाडी मित्र मंडळाच्या गणरायाचे हे ५२ वे वर्ष आहे. असंख्य बक्षीसांचा मानकरी म्हणून 'आर्थररोड राजा' म्हणून मुंबईत प्रसिद्ध आहे.
    या वर्षीची गणेश मूर्ती गणेश कल्याणकर यांनी केली असून गणेश महल सजावट - शेखर सोनावणे यांनी केला आहे.तसेच मंडळाने अल्प दरात आरोग्य शिबीर, भजन, मुलांसाठी विविध स्पर्धा, महिलांची पारंपरीक नृत्ये, गणेश याग, अथर्व शीर्ष पारायण, महाप्रसाद, आदीचे आयोजन केले आहे. या वर्षीचे अमित नाटेकर, अतुल देसाई, दीपक सागवेकर, हे पदाधिकारी आहेत. आर्थर रोड च्या राजाच्या दर्शना साठी पहिल्या दिवसा पासूनच गर्दी होत आहे.

आदर्श वार्ताहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ज्येष्ठानी आपल्या मालमत्तेचे इच्छापत्र करावे.........ऍड. निर्मला सामंत प्रभावळकर

मुंबई : " ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार, मन:ताप, त्यांचे शारीरिक व मानसिक आजार, हे समाजात नित्याचे झाले आहे. भविष्याची...