आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

घाटकोपरमध्ये शिवसेना(शिंदे गट )तर्फे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

मुंबई (शांताराम गुडेकर )परदेशात आरक्षण रद्द करण्या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्य विरोधात गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहे.आज घाटकोपर विक्रोळी अग्निशमन केंद्र येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.घाटकोपर पश्चिम विधानसभा प्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या आंदोलनात माजी नगरसेवक दीपक बाबा हांडे,डॉ.भारती बावदाने,महिला विधानसभा प्रमुख संगीता ताई हुले,उप विभाग प्रमुख हरेश धांदृत ,मनीष कळंबे,दत्ता केसरकर,मंगेश भोर,ज्योती शेळके ,विजय कोईलकर,शंकर व्हराडी,युसुफ खान,पूजा पवार,सुवर्णा वाळुंज,शाहीन शेख आदी सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
            परदेशात एका मुलाखतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या विषयी केलेले वक्तव्य चांगलेच तापले असून देशभरात त्याचा निषेध केला जात आहे. भाजपा,शिवसेना शिंदे गटाकडून या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला जात आहे.आज सकाळी पावसाचे वातावरण असतानाही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य बाबत राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे संविधानाचा अपमान आहे आणि त्याचा विरोध हा झालाच पाहिजे असे घाटकोपर पश्चिम विधानसभा प्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांनी सांगितले.

आदर्श वार्ताहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्यात सामंजस्य करार

लोणेरे (प्रतिनिधी ): रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशा...