आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

२५ ऑगस्ट २०२४ रोजी चिपळुणमध्ये राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलन

कोकण (शांताराम गुडेकर ) सह्याद्री समाचार न्यूज चॅनेल आणि पसायदान प्रतिष्ठान गुहागर आयोजित राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलन रविवार दि. २५ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वा. बाळशास्त्री जांभेकर सभागृह, लोकमान्य टिळक वाचनालय,जुन्या भैरीजवळ, चिपळुण येथे आयोजित करण्यात आले आहे.सह्याद्री समाचार वर्धापनदिन सोहळा निमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.संमेलनाचे उद्घाटक व संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील (पानिपतकार, प्रसिद्ध साहित्यिक)हे आहेत.तर शेखर निकम (आमदार चिपळूण- संगमेश्वर विधानसभा), प्रशांत यादव (प्रसिद्ध उद्योजक), सदानंद चव्हाण साहेब(माजी आमदार),सौ.स्वप्ना यादव (मुख्य कार्यकारी अधिकारी ,चिपळूण नागरी सह. पतसंस्था), चंद्रकांत भोजने (प्रसिध्द उद्योजक), सतीश कदम (संपादक, कोकण एक्सप्रेस), प्रमोद गांधी (मनसे संपर्क अध्यक्ष, गुहागर), श्रीकांत पाटील (प्रसिध्द साहित्यिक कोल्हापूर), दि बा. पाटील (ज्येष्ठ साहित्यिक सांगाली), नितीन ठसाळे (राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष), महंमद हुसैन मुसा(साहित्याचे अभ्यासक), दशरथ दाभोळकर (सामाजिक कार्यकर्ते)यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
            साहित्य संमेलनात "पसायदान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार- 2023" वितरण सोहळा संपन्न होणार आहे.ज्यामध्ये 
पसायदान राज्यस्तरीय काव्यपुरस्कार विजेते संकरणातील गिरकी (कवी भास्कर हांडे)
(प्रसिद्ध साहित्यिक, पुणे)अरुणावत रमेश सरकाटे (प्रसिद्ध लेखक, गझलकार, भुसावळ)यांना सन्मानित करण्यात येईल तर
डॉ.नागनाथ कोतापल्ले सर्वोत्कृष्ट बहुचर्चित कादंबरी पुरस्कार, देवा झिंझाड (प्रसिद्ध लेखक, पुणे)यांच्या एक भाकर तीन चुली आणि रावण राजा राक्षसांचा या शरद तांदळे (प्रसिद्ध लेखक, पुणे)यांच्या कादंबरींना प्रदान करण्यात येणार आहे.
           सह्याद्री विशेष काव्य पुरस्कार शशिकांत कापसे (पनवेल)यांना प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी पुस्तक प्रकाशन समारंभात प्रा.सुहास बारटक्के लिखित कथा संग्रह "वशाट आणि इतर कथा"आणि "कथा विविधा " चे प्रकाशन करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दिपक कारकर (निवेदक, पत्रकार)करतील.पुरस्कार वितरण नंतर राज्यस्तरिय निमंत्रितांचे कविसंमेलन प्रसिद्ध कवी अजय कांडर (कणकवली)यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख अतिथी म्हणून सफरअली इसफ (सिंधुदुर्ग)आणि मांगीलाल राठोड (प्रसिद्ध कवी बुलढाणा) हे उपस्थित राहणार आहेत.कवी संमेलनाचे निवेदन संजय बोरुडे (प्रसिद्ध साहित्यिक अहमदनगर)करतील.
                निमंत्रित कवींमध्ये मान्यवर कवी 
प्रतिक कळंबटे (सनगिरी),बाबासाहेब राशीनकर(गुहागर),मधुकर मातोंडकर(सिंधुदुर्ग),योगेश बंडागळे(चिपळूण),संजय कदम (चिपळूण) प्रदीप मोहिते (चिपळूण), गोपाळ कारंडे(मुंबई),मयुरेश माने,ओंकार विजय गुरव (गुहागर), चंद्रकांत बाबर (मिरज), ईश्वर हलगरे (गुहागर), संदेश सावंत (सावर्डे),संदेश पवार(चिपळूण),कु. सिध्दी चाळके(खेड) ,संदीप येलये(आगवे),अमित जावळे(गुहागर) या कवींच्या दर्जेदार कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सह्याद्री समाचारचे संपादक शाहीर शाहीद खेरटकर आणि ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब लबडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नेरे गावचा सुपुत्र गायक रवींद्र जाधव साई इंटरटेनमेंटच्या 'स्टार महाराष्ट्राचा' पुरस्काराने सन्मानित

गडब (अवंतिका म्हात्रे)एमसीयम टीव्ही आणि साईसागर आयोजित स्टार महाराष्ट्रचा पर्व १० वे पनवेल येथील २१ सप्टेंबर रोजी, आद्यक्रांतीवर वासुदेव बळ...