आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...!!

मुंबई : कुर्ला, नेहरूनगर ,येथील इमारत क्रमांक 79 अष्टविनायक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, (सायबा हेरिटेज) या नवीनच पुनर्विकास झालेल्या इमारतीमध्ये भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. नवीन इमारत भारतीय तिरंगा आणि रोषणाईने सजली होती. बाळ गोपाळांच्या वेगवेगळ्या स्पर्धा, कलात्मक रांगोळ्या, इमारतीमधील सर्वात लहान बालक(वय 4महिने) याच्या हस्ते ध्वजारोहण ...अशा अनोख्या रूपात यावेळी ध्वजवंदन झाले. यावेळी इमारतीमधील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन समुदाय या सर्वांनी एकत्रित येऊन स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. रांगोळीकार जुई विचारे यांनी अतिशय अप्रतिम रांगोळी काढली. सोसायटीतील श्री विनोद कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष श्री वासुदेव सावंत आणि सेक्रेटरी श्री लक्ष्मण पुजारी यांनी अतिशय मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जोगेश्वरीच्या अंकुश सर प्रतिष्ठानच्या वतीने फोर्ट घोडबंदर,काशीगाव येथील महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप व माहितीदर्शक तक्त्यांचे वितरण

मुंबई (उदय वाघवणकर) - मराठीतून शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा जोगेश्वरी पूर्व मध्य...