आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

श्याम ठाणेदार यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार !

पुणे: ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यातील टॅलेंट कट्टा ( अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ संलग्न ) संस्थेतर्फे महाराष्ट्रातील स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांना सह्यद्रिरत्न पुरस्कार देण्यात आला. सह्याद्रीरत्न हा महाराष्ट्रातील मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. १८ऑगस्ट रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार देण्यात आला. १८ ऑगस्ट रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते श्याम ठाणेदार यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी लक्ष्मण सावंत ( माजी आमदार बोपोडी मतदार संघ ) नितीन धवणे पाटील ( प्रसिद्ध उद्योजक मुंबई ) कुमारी आर्या घारे ( प्रसिद्ध सिने अभिनेत्री ) डॉ संतोष सदाशिव मचाले ( प्रसिद्ध लेखक ) तसेच दीपक जाधव ( टॅलेंट कट्टा संस्थापक अध्यक्ष ) आदी मान्यवर उपस्थित होते. श्याम ठाणेदार हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध स्तंभ लेखक असून महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रात ते नियमितपणे स्तंभ लेखन करतात. महाराष्ट्रभर त्यांचा वाचक वर्ग आहे. त्यांचे स्तंभ लेखनातील योगदान विचारात घेऊनच त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. स्तंभ लेखनातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सह्याद्रीरत्न पुरस्कार मिळाल्याने श्याम ठाणेदार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...