आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

राज्यस्तरिय एकांकिका - आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!


मुंबई(महेश्वर तेटांबे)संयोजन प्रा.लि. प्रस्तुत, संयोजन कंपनीच्या सर्वेसर्वा नम्रता भोसले यांच्या वतीने आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन यशवंत नाट्य संकुल माटुंगा, मुबई येथे संपन्न होणार असुन स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १९ ऑगस्ट, २०२४ ते २१ ऑगस्ट,२०२४ या कालावधीअंतर्गत होणार आहे. दिनांक २२ ऑगस्ट, २०२४ रोजी अंतिम फेरीत दाखल झालेल्या आणि राज्यभरातून आलेल्या एकांकिका मधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक, प्रमाणपत्र, आणि रोख रक्कम अशी भरघोस बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेत विजयी होणाऱ्या नाट्यसंघास संयोजन प्रा.लि. तर्फे जो महाकरंडक देण्यात येणार आहे ते खास वैशिष्ठ्यपूर्ण बनवून घेण्यात आलेला आहे .या स्पर्धेसाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून प्रामुख्याने ठाणे, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बीड़, नागपूर येथून स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रथम येणाऱ्या संघाला प्रथम प्रवेश या धर्तीवर प्रवेशिका देखील देण्यात आल्या आहेत. स्पर्धेचे स्लॉट दिनांक ५ ऑगस्ट, २०२४ रोजी करीरोड, लालबाग येथील राशी स्टुडिओ मध्ये दुपारी ३.०० वाजता उपस्थित स्पर्धकांसमोर काढण्यात आले असुन या स्पर्धेत एकूण ३२ संघांची निवड करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री दिलीप दादा जगताप साहेब आणि उद्योजक श्री वीरेंद्र शशिकांत पवार साहेब, आयडियल बुक डेपोचे श्री मंदार नेरूरकर, तसेच चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय पाटकर, श्री.जयवंत वाडकर, श्री.भूषण घाडी आणि अभिनेत्री सौ.संजीवनी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संपुर्ण स्पर्धेचे आयोजन सद्गुरु प्रॉडक्शन्स चे श्री.संदिप मोरे, सॅप प्रॉडक्शनचे श्री.अमर पारखे, निलेश प्रभाकर ,आशिष साबळे. ही मंडळी पाहत आहेत. रसिक प्रेक्षकांना ही नाटके विनामूल्य पाहता येतील तेव्हा हीं एक रसिकांना मनोरंजनाची पर्वणी असेल तेव्हा या कार्यक्रमात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आह़े.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे कृतज्ञता पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्रा तर्फे प्रतिवर्षी नवी मुंबई कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य क...