रायगड (महेश्वर तेटांबे) नुकतंच रायगड जिल्हा प्राथमिक शाळा चिंभावे येथील शालेय मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी मुंबई येथील नरेपार्क कट्टा ग्रुप परळच्या माध्यमातून शालेय उपयोगी वस्तूंचा संच मोफत वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. सदर उपक्रम प्रसंगी नरेपार्क ग्रुप कट्टाचे प्रसन्ना चव्हाण, वासुदेव आगरवाडकर, राहुल बर्डे, राजू मसुरकर, प्रमोद चिंदरकर, स्वप्निल करंगुटकर, प्रितेश चव्हाण, राजीव सिंग, गणेश आगरवाडकर, राहुल घाणेकर, प्रेमनाथ दुधवडकर, सनी नेरुळकर, विशाल गावडे, सागर पावले, ऋषिकेश आदींसह शाळेचे मुख्याध्यापक उदार, सरपंच विक्रम मालप अन्य मान्यवर उपस्थित होते. शालेय शैक्षणिक साहित्यामध्ये स्कुल बॅग, कंपास पेटी, लॉग नोटबुक, पेन, पेन्सिल, पाण्याची बॉटल, स्केच पेन, खोडरबर, शॉपनर, पट्टी तसेच पाटी आदी शैक्षणिक साहित्य तेथील ३६ विद्यार्थ्यांना
राहून सुपूर्द केले. यावेळी तेथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले होते. तर काही विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले. शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची सेवा आम्हाला सामाजिक सेवेतून प्राप्त झाल्याचे नरेपार्क ग्रुप कट्टाच्या मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लावावी आणि त्यांनी आपल्यासह आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल करावे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मनोगतात व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा