आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

राखी तर बांधते पण.....दादा मी सुरक्षित आहे का ??

भावा बहिणीचं अतूट नातं दर्शवणारा सण रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. बहीण भावाला संरक्षणार्थ राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचं आजन्म रक्षण करतो हीच काय ती सर्वांना माहित असलेली रक्षाबंधनची व्याख्या आहे. यंदा रक्षाबंधन सणाचे इतकेसे कौतुक कोणालाही नाही ह्याचे कारणही तसेच आहे. खरचं आता बहिणीचं रक्षण होतंय का ? बहीण सुरक्षित आहे का ? ह्या प्रश्नाच उत्तर कोणत्याही भावाला विचारलं तर तो शांत बसेल. कारण परिस्थिती आता बदलेली आहे. आताची आई,ताई,आजी आज सुरक्षित नाही ही खेदास्पद बाब आहे. कोलकाता केस, निर्भया, श्रद्धा अश्या कितीतरी माऊलींनी  आपला जीव गमावलाय. ज्या सोशल माध्यमंचा वापर जनजागृती तसेच शिक्षणासाठी केला जायचा त्याच माध्यमांमुळे महिलेला आज घरातून  बाहेर निघायला सुद्धा भीती वाटतेय कारण दररोज  कोणावर ना कोणावर अत्याचार, जबरदस्ती होतेय. 
    शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा भारत आता महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही. ह्याला जबाबदार हे आताची विचारसरणी तसेच आताचे नियम आहेत. कारण गुन्हेगाराला आता शिक्षेची भीती राहिलेली नाही, आणि शिक्षा देणाऱ्यांना गुन्हेगार सापडत नाहीये ! अशी गत आता झालेय. आणि म्हणूनच मानवीरूपात दैत्याचे विचार घेऊन वावरणारे हे नराधम बेफिकीर आहेत. हे आता थांबवण्यासाठी प्रत्येक महिलेने सक्षम होणं गरजेचं आहे हे वाक्य आता सत्यात उतरवण गरजेचं आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीला बिनधास्तपणे स्वसंरक्षणाचे धडे लहानपणापासून द्यायला हवेत. आणि सोबतच “ लाडक्या भावाला, सुद्धा पर स्त्री माते समान जाण ” ही जाणीव करून देणं आता गरजेचं आहे. आज त्याच जागी आपली बहीण असती तर..... हा विचार सुद्धा सहन होणार नाही कोणाला म्हणूनच प्रत्येकाने आता सबळ गरजेचं आहे. ही सबळता विचारांची आणि वागणुकीची असायला हवी.
   ह्यावर्षी रक्षाबंधनात प्रत्येक बहिणीने भावाकडून गिफ्ट म्हणून शिवछत्रपतींचे विचार अंगीकारा हे जर मागितले तर प्रत्येक भाऊ हा स्वतःच्याच नाही तर इतरांच्या देखील बहिणीचे रक्षण करण्यास सक्षम बनेल. प्रत्येक भावाने वैयक्तिक रित्या जर आपल्याला होईल तितके सकारात्मक विचार, स्त्री सक्षमीकरण,  स्वसरंक्षण ह्याबाबत आपल्या घरातील बहिणीला, महिलेला जर सांगितले तर नक्कीच थोडा का होईना पण बदल होऊ शकतो ! कारण आता द्रौपदीला वाचावायला श्रीकृष्ण येणारं नाही तर तिला स्वतःलाच सक्षम बनायचं आहे....!!




दिव्या पाटील,
 नवी मुंबई.
                  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे कृतज्ञता पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्रा तर्फे प्रतिवर्षी नवी मुंबई कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य क...