आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

वडखळ पोलीस निरीक्षकांची कौतुकास्पद कामगिरी ; पोलीस पाटील यांना एकच गणवेश

गडब (अवंतिका म्हात्रे) दि. 21ऑगस्ट रोजी 11.00 वाजता वडखळ पोलीस ठाणे येथे मा.sdpo साहेब श्री फडतरे साहेब यांच्या उपस्थितीत वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शना खाली हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची दहीहंडी ' श्री कृष्ण जन्माष्टमी ,श्री गणेश उत्सव , कायदा व सुव्यवस्था सतर्कता सुचना अनुषंगाने बैठक घेतली व दक्ष राहण्याबाबत व त्वरित माहिती पुरविण्याबाबत अवगत केले आहे .
   त्याचबरोबर हद्दीतील सर्व पुरुष पोलीस पाटील यांना एकाच प्रकारचा गणवेश सफारी प्रदान करण्यात आला आहे तसेच महिला पोलीस पाटील यांना एकाच प्रकारची साडी प्रधान करण्यात आली आहे. त्यावर त्याचे नाव, पोलीस पाटील गावचे नाव नमूद असलेले नेम प्लेट आहेत.  ह्यामुळे पोलीस पाटलांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल, बंदोबस्त, नाकाबंदी, रात्र गस्त मध्ये त्यांचा उपयोग होईल आणि प्रभावी गुन्हे प्रतिबंध करण्यात यश येईल.
   ह्या गोष्टी मुळे सर्व पोलीस पाठला मध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे ह्याचा उपयोग प्रभावी गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी करून घेत आहोत असे वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे म्हणाले याबददल सर्व स्तरातून या कामगीरीचे कौतुक होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कोकण - ( दिपक कारकर ) अल्पवधीत सामाजिक क्षेत्रासोबत राजकीय वर्तळात आगळीक ओळख निर्माण करणारे,गुहागर विधानसभा मतदार संघाचे भावी आम...