मुलुंड(सतिश वि.पाटील )पालघरच्या आदिवीसी मुलाने जागतिक कुस्तीत कास्य पदक पटकावून इतिहास रचला या साई पारधी वय वर्ष १७ पुरूष गटाच्या ५१किलो ग्रीको रोमन गटात त्याने कास्य पदक मिळवले. कु.साईनाथ पारधी असे खेळाडूचे नाव आहे.साईनाथने कास्य पदकाच्या सामन्यात कझीकीस्तानच्पा येरासील मुसानचा ३-१असा पराभव करून इतिहास रचला.साईनाथने रिपेचेस फेरीत अमेरिकेच्या मुनारेटो डाॅमिनिक मायकेल चा ७-१ असा पराभव करून पदकाच्या लढतीत प्रवेश केला होता.
साईनाथ पारधी हा मुळ पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील गोऱ्हे गावचा रहीवासी आहे.सातासमुद्रापार देशाचे, जिल्हाचे ,गावचे आईवडिलांचे नाव मोठे केल्याने संपुर्ण जिल्हात कौतुकाचा वर्षांव होत आहे. माणसाची परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीवर मात करण्याचे कसब असेल तर माणूस काहिही करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणून आज साईनाथचे गुणगान गायले जाईल. आज कास्य पदक पटकावले पुढे तुझ्याकडून गोल्ड मेडल अपेक्षा आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! जय हिंद !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा