आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

विहिरीवर दहीहंडी ची परंपरा अलिबाग " कुर्डूस" गावी रोमहर्षक क्षण !

मुंबई: आजपर्यंत मानवी मनोरे रचून अनेक बाळगोपाळ पथक पाहण्यात येतात. पण अलिबाग येथील "कुर्डूस" गावातील लोकांना एक आगळी वेगळी परंपरा जोपासली आहे ही कुतुहलाची कामगिरी आहे. अलिबाग पोयनाड कुर्डूस गावात ही आगळीवेगळी दहीहंडी १९९१ पासून सुरू झाली. मानवी मनोरे न रचता विहीरीच्या कठड्यावर चारपाच सहकारी उभे राहून गोविंदा त्यांच्या हातावर उभा राहून मग हंडी चा अंदाज बघून हाताच्या पंजावर गोंविदा सावध उभा राहतो.  विहिरीवर उंच बांधलेली हंडीला हाताचा स्पर्श करून हा मानकरी ठरायला जातो. जेव्हा शिटी वाजते तेव्हा तळहातावरील गोविंदा हा हनुमान पोझ मधून तयार असतो. बाळगोपाळ त्याला उंच हंडीच्या दिशेने भिरकवतात. तोच क्षण वेळेचे योग्य नियोजन करून गोविंदा मारूती सारखी आकाश झेप घेत हंडीला स्पर्श करून मानकरी ठरतो. या आगळ्यावेगळ्या हंडी साठी मुंबईतील पथके ही सामिल होवून मान मिळवण्याचा प्रयत्न करतात. देऊळ आळी गोंविदा पथक या हंडीचे आयोजन करतात .पराग पिंगळे,सचिन पिंगळे,सुशील कुमार पिंगळे,गुरुनाथ शेरामकर, गणेश केणी हे सर्व उत्सवाचे कार्यवाहक म्हणून काम करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !

मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...