मुंबई (प्रतिनिधी) विक्रोळी टागोर नगर येथील टागोर नगर मातुल्य को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. या संस्थेची कार्यकारी संचालक मंडळाची /व्यवस्थापक समितीची सन 2024 ते 2029 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून संस्थेच्या अध्यक्षपदी जितेंद्र महादेव येलवे, सेक्रेटरी कैलास डी. पानीग्रही , खजिनदार पदावर ⁸विष्णू वाडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिपत्याखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी काम पाहिले.
तसेच संचालक पदावर अनमोल गगे ,सचिन चौगुले, नारायण शेट्टी, अक्षय घरत ,राघवन राजू तर संचालिका पदावर संध्या करगुटकर व किरण भदोरीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले असून निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा