मुलुंड (सतिश पाटील )नुकत्याच झालेल्या नियोजत समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांची चर्चा सत्रात निवेदन सादर करून मुंबई पालिका रूग्णालये व्हेंटीलेटरवर आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.त्याचे जीव धोक्यात आहेत याची सरकारने गंभीर दखल घ्यावी व रूग्णालय सुविधा नागरिकांना मिळाव्यात अशी मागणी ईशान्य मुंबईचे खासदार श्री. संजय पाटील यांनी केली.
मुंबई पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत मांडण्यात आल्या ईशान्य मुंबईतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.ही बाब अध्यक्षांच्या लक्षात आणून दिली.यामध्ये पिण्याचे पाणी,आरोग्य व्यवस्था ,वैद्यकीय उपचार, डंपिंग ग्राऊंड या सर्व समस्यांचा यात समावेश आहे. या बैठकीला उपनगरातील सर्व आमदार, खासदार उपस्थित होते.
मुलुंड ते घाटकोपर डोंगराळ भागात संरक्षण भिंत नसल्याने हजारो कुटुंबाचे जीव धोक्यात घालून राहत आहेत. या सर्व समस्यांबाबत खासदार श्री संजय पाटील यांनी पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांना लेखी निवेदन दिले. या बैठकीत खासदार यांनी सांगितले माझ्या सहा विधानसभा असून त्याचे प्रश्न मला मांडायचे आहेत. ईशान्य मुंबई कचऱ्याचा अड्डा झाला आहे. तसेच डंपिंग परिसरात अद्ययावत रूग्णालय नसून उपचारा साठी त्यांना राजावाडी किंवा सायन रूग्णालय जावे लागते.त्या मुळे या भागातील सर्वच रूग्णालये ही व्हेंटीलेटर असल्याचा आरोप खासदारांकडून करण्यात आला . मुलुंड मधील सरकारी आगरवाल रूग्णालय नूतनीकरण करण्यात साठी मागील १०-१२ वर्ष प्रलंबित आहे. ते लवकरात लवकर सुरू करून जनतेस सुविधा उपलब्ध करून द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा