आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा गरजू विद्यार्थ्याना शिष्यवृत्या

 मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या मराठा ज्ञातीतील, ज्या पालकांची मुले/मुली बी.एस.सी.(आय, टी.) /(कॉम्प्युटर), सी.ए. तसेच मेडिकल, इंजिनिअरीग, अग्रीकॅल्चर, फार्मसी कॉलेज व नर्सिंग मध्ये शिक्षण घेत आहेत, अशा गरजू व हुशार मुलांना परत फेडीच्या अटीवर, शिष्यवृत्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी गरजू विद्यार्थ्या कडून संस्थेच्या छापील फॉर्मवर अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यानी छापील फॉर्मसाठी स्वत:चे नाव व पत्ता लिहिलेले व त्यावर पाच रुपये पोस्ट तिकीट लावलेले पाकीट, व आपली पूर्ण माहिती, सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई, स्टार मॉल, ३ रा माळा, न. चि. केळकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८ (दूरध्वनी -२४३०३५८५ ) “ या पत्त्यावर दि. 30 ऑगस्ट 2024 पूर्वी पाठवावेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन

मुंबई (शांताराम गुडेकर )   साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...