गट- ब : २६ ते पुढील या वयोगटासाठी कविता वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
रविवार, दि. २५/०८/२०२४ या दिवशी संध्याकाळी ०६ .०० वाजेपासून हि स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आपले नाव व कवितेचे नाव दिनांक २३ ऑगस्ट२०२४ पर्यंत खालील दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकांंवर द्यावीत.
झूम लिंक आणि वेळ आपण जॉईन केलेल्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये मिळेल. स्पर्धेच्या निकालाची तारीख नंतर कळविण्यात येईल.स्पर्धेसाठी कविता / गाणी बहिणाबाईंंचीच असावीत.स्पर्धेचे नियम आणि परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांवर बंधनकारक असेल.एखाद्या तांत्रिक किंंवा इतर कारणामुळे स्पर्धेेस/निकालास विलंब झाल्यास सहकार्य करावे. सहभागी स्पर्धकांमधून खालीलप्रमाणे विजेते निवडले जातील.
गट _१ प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक,तृतीय क्रमांक ; गट _२ प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक
तृतीय क्रमांक .स्पर्धक प्रतिसादानुसार पारितोषिक कमी-जास्त करण्याचे सर्वाधिकार संयोजन समितीला असतील.कविता सादरीकरणासाठी वेळ ३( तीन) मिनिटांचा राहील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क:
श्री. लिलाधर महाजन, मो.नं. ९८६७२४९७१८, डाॅ. चंद्रशेखर भारती, मो.नं. ८८२२३३१०१०
स्पर्धेचे सहभाग प्रमाणपत्र तथा विजेत्यांना विजेते प्रमाणपत्र ऑनलाईन पाठवले जाईल याची कृपया नोंद घ्यावी असे अध्यक्ष- किसन वराडे;
बहिणाबाई साहित्य परिषद, डोंबिवली (मुंबई) यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा