कोकण (शांताराम गुडेकर ) मान.उच्च न्यायालयाचा आदर ठेवून शरद पवार,उद्धव ठाकरे,नाना पटोले व महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी महाराष्ट्र बंद चा निर्णय मागे घेतला.महाराष्ट्र बंद मागे घेतला असला तरी बदलापूर घटना अतिशय निंदनीय व संतापजनक असल्याने या घटनेचा निषेध करण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काळ्या फिती बांधून आज(दि.२४ ऑगस्ट ) बदलापूर घटनेचा निषेध केला.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा निषेध करण्यात आला.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्याशेठ बोरुकर, माजी उपसभापती अजित गवाणकर, शहरप्रमुख दादा शिंदे, मुन्ना थरवळ, युवासेना उप तालुकाप्रमुख तेजस भाटकर, सचिन शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष निलेश भुवड, संदेश जाधव, शाखाप्रमुख विनोद माने, मुबीन पटेल, संतोष शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२६/११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
मुलुंड( सतिश वि.पाटील)२६/११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा