कोकण (शांताराम गुडेकर)रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर मार्गांवरील बोंड्ये गावातील नागरिकांची एस. टी ची प्रतीक्षा संपली असून आजपासून पुन्हा देवरुख -बोंड्ये एस. टी. ही देवरुख एस. टी आगार मधून सोडण्यात आली.ही एस. टी सहा महिन्यांपासून खड्डे आणि झाडांच्या वाढलेल्या फांदया, चिखल असं कारण देत बंद करण्यात आली होती.बोंडये बससाठी पत्रकार संदीप गुडेकर, माजी सरपंच ललिता गुडेकर, विद्यमान सरपंच नम्रता पांचाळ यांनी देवरुख आगार व्यवस्थापक यांना पत्रव्यवहार करून झाडीची असलेली अडचण तसेच पडलेले खड्डे ही समस्या मार्गी लागली असून देवरुख -बोंड्ये एस. टी सुरु करावी अशी मागणी केली होती.सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामस्थ यांनी वाढलेली झाडे, फांदया तोडून मार्ग मोकळा केला.पडलेले खड्डे भरले.झालेल्या मागणीचा विचार करून तसेच सतत होत असलेला पाठपुरावा लक्षात घेऊन देवरुख आगार व्यवस्थापक यांनी एस. टी सुरु केली.त्यामुळे बोंड्ये गावच्या नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून लोकप्रतिनिधी,संबंधिक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग,प्रसिद्धी माध्यम यांचे आभार मानले आहेत.कारण काही दिवसांवर गणपती उत्सव आहे.हजारो मुंबईकर,अन्य भागातील पाहुणे,दिव्यांग, गरोदर महिला,या मार्गांवरून ये -जा करणार असून त्यांनाही या समस्याला तोंड द्यावे लागणार होते.विद्यार्थी,चाकरमनी(मुंबईकर ),नोकर दार वर्ग यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार होता.मात्र लोकप्रतिनिधी, देवरुख आगार- रत्नागिरी विभाग यांनी मागणीची दाखल घेत एस. टी. सुरु त्यामुळे संभाव्य त्रासातून बोंड्ये गावातील लोकांची सुटका झाली आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा