गडब (अवंतिका म्हात्रे)उरण व नवी मुंबईतील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला व मुलीं वरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी दामिनी पथकाची पुर्नरस्थापना करून पेणच्या भगिनींना संरक्षणाची कवचकुंडले दिली आहेत.
या अंतर्गत पेण पोलीस ठाण्याचे कार्यरत असलेल्या चार महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये सौ. शिंदे, सौ. पालवे, सौ. धनावडे, व सौ. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पेट्रोलिंगकरीता अद्यावत नविन मोटार सायकल व एमडीटी (११२) सेवा पुरविण्यात आली आहे. डायल ११२ ही सेवा तात्काळ मदत पुरविण्यासाठी कटिबध्द आहे.
सदर दामिनी पथक शहरातील पेण बस स्थानक, सार्वजनिक विद्यामंदीर, गुरुकुल शाळा, प्रायव्हेट हायस्कूल, केईएस शाळा, कारमेल हायस्कुल, पतंगराव कदम हायस्कुल, आयटीआय कॉलेज रामवाडी, कंवडाळ तळा, ठाकुर क्लासेस, चिंचपाडा, आर्या क्लासेस चावडीनाका, ग्रिन पार्क, महिला आश्रम महाडीकवाडी, विरेश्वर घाट, विसर्जन, कुंभार तलाव, भुंडा पुल, मोतीराम तलाव या परिसरात नियमित गस्त घालणार आहे.
पेण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व महिला भगिनी व मुलींनी महिला अत्याचार गुन्हयाच्या अनुषंगाने काही मदत लागल्यास डायल ११२ यावर कॉल करुन, तात्काळ मदत प्राप्त करुन घ्यावी असे आवाहन पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा