आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

गडब गावात आलेल्या पुर परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान ; तलाठी पंकज डोंगरे यांच्याकडून शेतीचे पंचनामे

गडब(अवंतिका म्हात्रे) पेण तालुक्यातील गडब गावात अतिवृष्टीमुळे गावातील शेतीचे नुकसान झाले आहे . खारघाट ,खारमाचेला, खारजांभेला, खारढोंबी व खारचिर्बी येथे झालेल्या पूर परिस्थीतीचा शेती पंचनामा पाहणी गडब ग्रुप ग्रामपंचायतीचे तलाठी पंकज डोंगरे यांनी स्वतः शेतीवर घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत पोलीस पाटील, व गावातील शेतकरी पत्रकार उपस्थित होते .यावेळी गडब गावातील शेतकऱ्यांनी आपली कैफित तलाठ्यांकडे मांडली.
    यावेळी पंकज डोंगरे यांनी प्रत्यक्ष पीक लावलेल्या ठिकाणी शेतकर्यांन सोबत जाऊन पाहणी केली,व शेतीचे पंचनामे केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे चिपळूण येथे प्रकाशन

मुंबई (शांताराम गुडेकर )   साप्ता.लोकनिर्माण वृत्तपत्राच्या सोळाव्या वर्षाच्या दीपावली- २०२४ ( प्रतिबिंब ) या विशेषांकाचे प्रकाशन वृत्तपत्रा...