देवनार (राजाभाऊ गमरे) एक तप म्हणजे गेली बारा वर्षांपासून संकल्प संस्था गेली १२ वर्षापासून शैक्षणिक, आरोग्य, महिला सक्षमीकरण, वस्ती संघटन या विषयावर काम करणारी वेळोवेळी सामाजिक भान राखून समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर राहणारी संकल्प संस्था म्हणजे चेंबूर, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, एम/पूर्व विभागास तेथील वस्त्या वस्त्यांना मिळालेलं वरदानच म्हणावं लागेल, सालाबादप्रमाणे यंदाही संकल्प संस्था व आरिन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे व आरिन फाउंडेशनचे अध्यक्ष नितेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. १४ ऑगस्ट रोजी एम/पूर्व विभागातील मोहमद रफी नगर, शिवाजी नगर, गोवंडी येथील देवनार डम्पिंग ग्राउंड वस्तीतील कचरा वेचक कुटुंबातील १०० मुलांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक विषयावर मौलिक मार्गदर्शन करीत भविष्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल चर्चा केली, तसेच संकल्प संस्थेच्या सचिव सविता हेंडवे यांनी एम पूर्व विभागा मधील वस्ती विकास प्रकल्प अंतर्गत वस्ती मध्ये होणार्या होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम संकल्प संस्था मधून सविता हेंडवे आणि आरिन फाउंडेशन कडून किरण जाधव यांनी पाहिले तर सुनिता उघडे व सीमा परिहार यांनी वस्ती पातळीवर कचरा वेचक कुटुंबातील मुलांबरोबर नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच विशेष सहकार्य करणाऱ्या संकल्प संस्थेचे कपिल क्षीरसागर आणि दीपा गमरे यांचे तसेच उपस्थितांचे आभार मानून अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा