मुंबई (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न शिवडी गटक्रमांक १३ यांच्या संयुक्त विद्यमाने ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन विभागाचे गटप्रमुख तसेच साहित्य, कला, क्रीडा समिती अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या अधिपत्याखाली मोठ्या उत्साहात झाला.
सदर प्रसंगी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित विभागातील जेष्ठ कार्यकर्ते भगवान साळवी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, कार्याध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष राजू धोत्रे, सरचिटणीस संदीप मोहिते, कोषाध्यक्ष प्रविण तांबे, सचिव अजय पवार, नरेश सपकाळे, वायंगणकर, जगन्नाथ जाधव, मंगेश जाधव, दर्शन जाधव, सीताराम कांबळे, आनंद मोहिते, समाजसेवक सय्यद कादर, दीपक हरी वाघ, मंगेश शिंदे आदी मान्यवर तसेच संलग्न सर्वच शाखांचे प्रमुख कार्यकारिणी, सभासद, कार्यकर्ते, विभागातील व्यापारीवर्ग, रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी अध्यक्षीय भाषणात "देशातील सर्व धर्म, पंथांच्या नागरिकांनी आपसात जातीपातीचे विष न पेरता सर्वधर्मसमभाव व माणुसकीची भावना जोपासत देशात शांतता अबाधित राखून, स्वातंत्र्य भारताच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे" असे आवाहन केले, तद्नंतर भगवान साळवी, कार्याध्यक्ष संतोष जाधव, जगन्नाथ जाधव यांनी देखील स्वातंत्र्य दिनावर आपले मौलिक विचार मांडून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
सरतेशेवटी सरचिटणीस संदीप मोहिते यांनी बौद्धजन पंचायत समिती संलग्न शिवडी गटक्रमांक १३ च्या अधिपत्याखाली झालेल्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा