आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

नाहूरगावठाण मुलुंड येथे पारंपारिक व भक्तिमय वातावरणात श्री रामनवमी व श्री हनुमान जन्मोत्सव साजरा


मुंबई ( सतिश वि.पाटील)नाहूरगावठाण मुलुंड पारंपारिक व भक्तिमय वातावरणात श्री रामनवमी उत्सव व श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली अनेक वर्ष साजरा केला जातो .नाहूरगाव विकास मंडळ यांच्या कडून उत्सव साजरा केला जातो. यामध्ये हिरादेवी ब्राॅस बॅन्ड, परेश डेकोरेटर, नाहूरगाव रिक्षा चालक मालक संघ मोलाची कामगिरी बजावतात. सर्वच राजकीय पक्ष या उत्सवात सहभागी होवून पालखी व दर्शन याचा मोठ्या भक्ती भावाने सहभाग घेतात .पालखीत लेझीम,बॅन्ड आणि भजनी मंडळ सहभाग घेवून आंनद द्विगुणित करतात. 
    पालखी गावात फिरून झाल्यावर सर्व भक्त मंडळीस भोजन व्यवस्था ही परेश डेकोरेटर यांच्याकडून अनेक वर्ष केली जाते. अनेक ठिकाणी सरबत ,नाश्ता दिला जातो .तसेच श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मैदानी ,चित्रकला ,निबंध स्पर्धा असे कार्यक्रम मंडळ आयोजित करते , तसेच या वर्षी चार बॅन्ड पथक यांनी आपले कौशल्य सादर केले . त्यात भर म्हणजे आपले लाडके सुप्रिध्द गायक व बिगबाॅस फेम कोळीगीत व लोकगीत दादूस श्री संतोष चौधरी यांनी लोकांना आपल्या आवाजात ठेका धरून नाचवले, तसेच दुसरीकडे भंडारा व महाप्रसाद याचा जनतेने लाभ घेतला .नाहूरगाव रिक्षाचालक मालक यांच्या कडून अनेक वर्ष थंडगार छास वाटण्यात येते .मंडळास पालखी परेश डेकोरेटर,श्री. सतिश वि.पाटील व हिरादेवी ब्राॅस बॅन्ड कडून देण्यात आली. श्री हनुमान मंदिर फार पुरातन काळापासून( ब्रिटिश कालीन) आहे .मारूती रायाची पाषाण मुर्ती आहे बाकी इतर मूर्तीची प्रतिस्थापना केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी दिलेल्या निवेदनाला यश

गडब (अवंतिका म्हात्रे) पेण तालुक्यातील गडब येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यासाठी पेण विभाग नियंत्रक दीपक घोडे व पेण डेपो इन...