आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

डी.एड १९९० ते १९९२ बॅच चे गेट टुगेदर संपन्न

मुंबई( गणेश हिरवे) पद्मभूषण ताराबाई मोडक अध्यापक विद्यालय दादर येथून सन १९९० ते १९९२ या डी एड बॅच चे स्नेह संमेलन नुकतेच दादर येथे मोठ्या उत्साहात केक कापून संपन्न झाले.यावेळी येथून डी.एड झालेले अनेक मित्र मैत्रिणी आज वेगवेगळ्या शाळा आणि इतर अनेक आस्थापना मध्ये उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत.आज जवळपास बत्तीस वर्षांनी या सर्वांनी एकत्र येत मस्त धमाल केली..नाच-गाणी, कविता, शेरो शायरी, जुन्या नवीन आठवणी एकमेकांशी शेअर करीत कार्यक्रमाचा आनंद घेत आजचा भेटीचा दिवस अविस्मरणीय केला.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शिक्षक विश्वनाथ पांचाळ यांनी मेघा सुर्वे, रत्नकांत विचारे, केरू डोखे,किसन धोंगडे,अशोक चव्हाण, सुरेश केंगार, रवी बडवे, गोरखनाथ शिरसाठ या मित्रांच्या मदतीने पुढाकार घेतला.शेवटी सर्वांना आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचलन उषा आंबोकरने केले.तसेच यापुढेही आपण एकमेकांना असेच भेटत राहू या विश्वासाने राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शहापूर तालुक्यातील नडगावं जिल्हा परिषद गटातून हर्षल शेलवले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

शहापूर (प्रतिनिधी): शहापूर तालुक्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील महत्त्वाचं जिल्हा...