मुंबई ( प्रतिनिधी) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, शिरगाव यादव नगर येथील ६४ सभासद असलेले मॅरेथॉन नगरी अस्मिता को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्यवस्थापक समितीची पंचवार्षिक निवडणूक सन 2024 ते 2029 या कालावधी करीता निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे व सहाय्यक निवडणूक अधिकारी राज जाधव यांच्या अधिपत्याखाली नुकतीच बिनविरोध निवडणूक पार पडली असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष अंकुश औंधकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
या संदर्भात अधिक माहिती अशी की संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी अंकुश तुळशीदास औंधकर सचिवपदी प्रमोद साहेबराव निकम तर खजिनदार पदी सस्मिता बी मोहंती तर संचालक सदस्य पदावर सचिन नारायण कांबळे, विनोद कुमार मिश्रा, तुषार सुरेश तावडे, राजेश सुदाम कांबळे, शिवदास ताराचंद खैरनार, इन्नूस गुलाब शेख, उमेश महारु राठोड, गौरी सदाशिव गलांडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली असून सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून यावेळी सोसायटीतील सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. अल्पोपहार झाल्यानंतर संस्थेचे सचिव प्रमोद निकम यांनी सर्वांचे आभार मानले व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर कांबळे व सहाय्यक निवडणूक अधिकारी राज जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा