अलिबाग ( दिनेश तुरे यांजकडुन) : कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की , मुक्काम - दिवीपारंगी , पोष्ट -चिंचोटी , तालुका -अलिबाग , जिल्हा –रायगड, येथील आगरी समाजाच्या प्रेमळ व परोपकारी तसेच सेवाभावी वृत्तीच्या जेष्ठ समाजसेविका कै. श्रीमती आनंदी नथु ठाकुर यांचे शुक्रवार दिनांक ०९-०२- २०२४ रोजी वयाच्या ९५ वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्याच्या पश्चात मुलगा विश्वनाथ , सुन -विद्या , नातं -अंकिता ,चार मुली , नातवंडे , आप्तेष्ट -नातेवाईक व ठाकुर परिवार असा विशाल परिवार आहे. आयुष्यभर शेतीत काबाड कष्ट करून त्यांनी आपल्या संसाराचा डोलारा समर्थपणे सांभाळला. ग्रंथ पारायणाची त्यांना विशेष आवड होती. गोरगरीब जनतेस न्याय मिळवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. सामाजिक सेवेची त्यांना विशेष आवड होती. अध्यात्त्मक सेवेस त्यांनी स्वतःला झोकूनं दिल होत , त्याच्या निधनाने विभागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . त्यांच्या अंतयात्रेत सामाजिक -राजकीय व अध्यातत्मिक क्षेत्रातील विशाल जनसमुदाय उपास्तित होता हीच त्यांच्या सामाजिक कार्याची पोहचपावती होय. त्यांचे दिवसकार्य सोमवार दिनांक १९-०२-२०२४ रोजी त्यांच्या दिवीपारंगी या निवासस्थानी सकाळी ९.०० वाजता होणार आहे,असे त्यांच्या ठाकुर परिवारातर्फे कळविण्यात आले आहे .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शिक्षक दिनानिमित्त नारायणगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सन्मान
वासिंद(हर्षल शेलवले)- शिक्षक दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी नार...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा