घाटकोपर(शांताराम गुडेकर ) रोचीराम थडानी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडीकॅप शाळेत कर्णबधिर विद्यार्थांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर ऑर्गनायझेशनचे महसमादेशक अनील कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नव्या रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन कोल्हापूर यांचे युनिट सुरू करण्यात आले आहे. यावेळी मुंबई समाज कल्याण खात्याचे सह आयुक्त प्रसाद खैरनार , मुंबई विभागीय समादेशक सुभाष मोरे , संस्थेचे संस्थापक सदस्य अमोघसिद्ध पाटील , आर एस पी शिक्षक अधिकारी कुंतला चौधरी , रत्नश्री जाधव , पपन साहेजा आदी सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी संचलन केले व 3 डी मॉडेल तयार करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेतील आर एस पी अधिकारी विलास पंडीत यांना स्पेशल स्कूल युनिट अध्यक्ष तर संजय पिंपळे सर यांना स्पेशल स्कूल मुंबई युनिट चे सचिव या पदावर नेमणूक करण्यात आली. सुरू करण्यात आलेल्या कार्यशाळेत काणे यांनी उपस्थित अधिकारी वर्गाने विद्यार्थांच्या रोजच्या जीवनात रहदारीचे कोणते नियम पाळणे आवश्यक आहे व रस्त्यावर चालताना घ्यायची काळजी त्याबद्दल मार्गदर्शन केले. मुंबई विभागीय समादेशक सुभाष मोरे यांनी हा उपक्रम विविध शाळांमध्ये सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. तर समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी हा कार्यक्रम राबविण्यासाठी आम्ही जीवनावश्यक कौशल्ये देणारे उपक्रम राबविण्यासाठी उत्सुक असून आमच्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले. तर या शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री वर्तक म्हणाल्या साधरण एक वर्षापूर्वी सुनील रावत व वी आय ए संस्थेमार्फत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आमची मुले कर्णबधिर असून सुद्धा या उपक्रमात मनापासून सहभागी झाले आहेत याचे मला कौतुक वाटते. माझा शाळा हा उपक्रम राबवणारी महाराष्ट्र जिल्ह्यातील प्रथम विशेष शाळा आहे याचा अभिमान वाटतो असे मुख्याध्यापक भाग्यश्री वर्तक म्हणाल्या. यावेळी भाग्यश्री वर्तक यांच्या शुभ्रा प्रकल्प तर्फे विद्यार्थांना किट चे वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा