आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

प्रकल्पबाधितांना सहकार्य करणार :शरद पवारांचे आश्वासन ; अॅड. गोवारी यांची माहिती

गडब(अवंतिका म्हात्रे) नैना प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून, येत्या सहा डिसेंबरपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत उपोषण करणार आहेत. या आंदोलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शविला असून, या प्रश्नासंदर्भात आंदोलक आणि मुख्यमंत्री यांची एक बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या समितीने सोमवारी पवार यांची भेट घेतली, अशी माहिती प्रकल्पग्रस्त समितीचे सरचिटणीस अॅड. मदन गोवारी यांनी दिली.
     सिडकोकडून राबविण्यात येत असलेला नैना प्रकल्प रद्द करावा, तसेच पनवेल, उरण नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बांधलेली रहिवासी, वाणिज्य वापरातील बांधकामे जेथे आहेत तेथे नियमित करावी, साडेबारा टक्के योजनेमार्फत प्राप्त भूखंडामधून बेकायदेशीर कपात परत करण्यात यावी, यासह विरार-अलिबाग कॉरिडॉर, लॉजिस्टिक पार्क, महाऊर्जा प्रकल्पांबाबतचे प्रश्न सोडवावे, अशा त्यांच्या मागण्या आहेत.या वेळी समितीचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकुर, प्रशांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते), अनिल ढवळे (माजी सरपंच शिवकर), रवींद भगत (माजी नगरसेवक), अॅड. मदन गोवारी (सरचिटणीस), अतुल म्हात्रे (वास्तुविशाद) आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...