आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

बाप्पांची नगरी फलकबाजीमुळे विद्रुप

गडब(अवंतिका म्हात्रे ) गणपती मूर्तीचे माहेरघर आणि पापड उद्योगासाठी प्रसिध्द असणारे पेण शहर जाहिरात फलकबाजीमुळे विद्रुप झाले आहे. गेल्या सात महिन्यात फक्त ११ जणांनीच नगर परिषद प्रशासनाकडून फलक लावण्यासाठी परवानगी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उर्वरीत फलक लावणाऱ्यांवर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकीकडे पेण पालिका स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे काम करत आहे. शहरातील स्वच्छतेसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवून जनजागृतीसाठी लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, दुसरीकडे याच अभियानाकडे पाठ फिरवून अनेक जाहिरातदार पेण पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे फलकबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करत आहेत. पेण शहरात शेकडो जाहिरातींचे फलक झळकत आहेत. त्यावरून खऱ्या अर्थाने पालिकेला लाखो रुपयांचा कर उपलब्ध होणे क्रमप्राप्त होते, मात्र आश्र्श्वयाची बाब म्हणजे पेण पालिकेला मागील सात महिन्यात फक्त अकरा जाहिरातदारांच्या माध्यमातून फक्त ३९ हजार ३८० रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. राजकीय पुढारी तसेच शिकवणी वर्ग चालवणारे बेधडकपणे जाहिरातीचे फलक लावत आहेत. राजकीय पुढारी तर वाढदिवसाला १० ते १५ दिवस अगोदरच फलक लावून स्वतःचीच जाहिरात करताना दिसत आहेत. हुतात्मा स्मारकात ठिकाणी देखील फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये मोठया प्रमाणात नगरपालिकेचा महसूल बुडविला जात आहे. त्यामुळे या शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या आणि शासकीय नियम धाब्यावर बसवून पालिकेचा कर बुडवणाऱ्या जाहिरातदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पेण शहरातून होत आहे.
पेण शहरामध्ये अनधिकृत बॅनर
लावण्याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिकेचे अधिकारी आहेत. कर आकारण्याबाबत कोणतीही नियमावली तयार करण्यात आलेली नसल्याने अधिकारी फलक लावणाऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा कर आकारत आहेत. प्रशासन पुढाऱ्यांच्या विरुध्द कारवाई करताना दिसत नाही. राजकीय पुढारी आठ ते दहा दिवस अगोदर आपले फलक लावून शहराच्या विद्रुपीकरणात भर *पेण शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलक लावले जात आहेत. वेळोवेळी कारवाई केली जात आहे. मात्र हे अनधिकृत फलक लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. आम्ही तातडीने पुन्हा एकदा अतिक्रमण विभागाला कारवाईचे आदेश देत असून पेण शहरात ज्या फलक बनविण्याच्या छपाई यंत्रणा आहेत त्यांना सुद्धा जोपर्यंत पालिकेत कर भरल्याची पावती जाहिरातदार दाखवणार नाही तोपर्यंत फलक छपाई करण्यात येऊ नये अन्यथा त्यास तुम्ही जबाबदार असाल अशा प्रकारची नोटीस देखील तातडीने काढत आहोत.
 सुहास कांबळे, नगर अभियंता पेण न. पा.
पाडत आहेत. फलक छपाई करणाऱ्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर कारवाई करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला पकडण्याचा प्रकार आहे. स्वत:च्या चुका लपवण्यासाठी फलक छपाई व्यवसायिकांना जबाबदार धरू नये, अशी मागणी माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...