डोंबिवली ( गुरुनाथ तिरपणकर) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, हौशी अभिनेते, झुंजार वक्ते, युनियन लीडर, समाजसेवक आणि हौशी लेखक कै. बाळ बागवे स्मृती लघुकथा स्पर्धेचा बक्षिस समारंभ शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी येथील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्टच्या यशोनंदन हॉल येथे संपन्न झाला. इंटरनेट माध्यमातून जगभरातून एकूण ८४ कथा प्राप्त झाल्या. प्रा. वृषाली विनायक, यांनी पहिल्या फेरीचे तर किरण येले, यांनी दुसऱ्या फेरीचे परीक्षण केले. कथा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे...प्रथम - वैशाली फाटक- काटकर,द्वितीय - शिरीष नाडकर्णी,तृतीय (विभागून) - विशाल पवार व मेघना साने,उत्तेजनार्थ - मनीषा कडव, संध्या धर्माधिकारी, श्रध्दा वझे, साईनाथ टांककार, माधुरी कामत, प्रणाली देशमुख, प्रा. धनाजी बुटेरे याच कार्यक्रमात अक्षरगंध - दिवाळी अंक - सर्वोत्तम मुखपृष्ठ स्पर्धेचे देखील पारितोषिक वितरण झाले. सर्वोत्तम अंक - बी पॉझिटिव्ह सर्वोत्तम मुखपृष्ठ - सृजनसंवाद,सर्वोत्तम मांडणी सजावट - मनोकल्प.
या कार्यक्रमाला किरण येले (कवी- कथालेखक )आणि प्रा. अशोक बागवे(ज्येष्ठ कवी, साहित्यिक) आणि वक्ते उपस्थित होते. अनेक साहित्यप्रेमी रसिक आणि साहित्यिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मनिषा चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन केले. प्रतिभा प्रकाशनचे ब्रँडबाँड निलेश B+, अक्षरगंधच्या उल्का बागवे आणि त्यांची टीम यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा